गांजा लावू द्या, किडनी विकू द्या, शेतकऱ्याची थेट जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अजब मागणी केली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे किडनी विकू द्या किंवा गांजा पेरण्या परवानगी द्या अशी अजब मागणी केली आहे.
गंगाधर तायडे असं या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. ते बुलढाणा तालुक्यातील पलढग येथे राहतात. या शेतकऱ्याकडे वर्ग दोनच्या असलेल्या शेतीवर राष्ट्रीयकृत बँकांकडून अत्यंत अल्प प्रमाणात कर्ज मिळते, त्यामुळे खाजगी बँक आणि सावकारांकडून कर्ज घेऊन शेतात पीक पेरणी करावी लागते. मात्र, शेतीतील उत्पन्न खाजगी बँकांच्या आणि सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी अपुरे आहे. त्यामुळे हे पीक कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर नव्हे औरंगाबादच लिहा, हायकोर्टाचे नवे आदेश पीक कर्जासाठीखाजगी बँका आणि सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याची परवानगी द्या किंवा शेतात गांजा पेरण्याची परवानगी द्या अशी अजब मागणी या शेतकऱ्याने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्याकडे करून खळबळ माजवून दिली आहे. येत्या एक जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलेल्या निवेदनावर कुठलीच ठोस कारवाई न झाल्यास एक जून पासून मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या शेतकऱ्याने दिला आहे. त्यामुळे या अजब मागणीने जिल्हाधिकाऱ्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे.शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे शिवारात घडली. सध्या जखमी असलेल्या शेतकऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे येथील शेतकरी प्रकाश श्रीराम मुंढे (वय 53) यांचे पांग्रा डोळे शिवारात शेत आहे. ते नेहमीप्रमाणे शेतात काम करून शेतातून पायी घरी येत होते.
दरम्यान, समोरून रानडुकराचा कळप त्यांच्या अंगावर चालून आला. या कळपातील एका रानडुकराने प्रकाश मुंढे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना चावा घेतल्यामुळे प्रकाश मुंढे हे गंभीर जखम झाले. या रानडुकरापासून मुंढे यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत घर गाठले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.