Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कबनूरमध्ये फटाका गोदामात स्फोट, मालकाचाच मृत्यू!

कबनूरमध्ये फटाका गोदामात स्फोट, मालकाचाच मृत्यू!


इचलकरंजी :  कबनुर येथील महात्मा फुलेनगर मधील एका फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट झाला. या स्फोटात फटाका मार्टच्या मालकाचाच मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास ही भीषण घटना घडली. परवेझ मुजावर (वय 35) असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीसानी भेट देवून  पंचनामा केला. कबनूर-कोल्हापूर रोडवर फुलेनगर येथे मुजावर यांचा फटाके तयार करण्याचा कारखाना तसेच गोदाम आहे. 

नेहमीप्रमाणे मुजावर आज सकाळी फटाका गोदामात सफाईसाठी गेले होते. दार उघडून ते आत गेले. त्यावेळी त्याना काही समजण्यापूर्वीच स्फोट झाला. त्यांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही. त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की सगळा परिसर हादरुन गेला. स्फोटाचा आवाज सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ऐकू आल्याचे सांगण्यात आले. या स्फोटात गोदमच्या भिंती जमीनदोस्त  झाल्या. तर छताचे पत्रे दुरवर उडून गेले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.