Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष ?

सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष ?


मुंबई: राजीनाम्याबाबत विचार करण्यासाठी शरद पवार यांनी दोन-तीन दिवस मागितले असले, तरी ते आता अजिबात माघार घेण्याच्या विचारात नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, पक्षाचा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती नेमली असली, तरी पक्षातले एकूण वातावरण पाहता पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष लपून राहिलेला नाही. वरवर कितीही सलोखा असल्याचे सुप्रिया आणि अजित पवार दाखवत असले, तरी पक्षावर कुणाची पकड असावी, यावरून या भावंडात संघर्ष सुरू आहे. त्यांचे समर्थकदेखील आगामी काळात विभागले जाण्याची शक्यता आहे.

मात्र, शरद पवार सुप्रियांच्याच बाजूने कौल देतील, हे उघड गुपित असल्याने ज्येष्ठ नेतेही सुप्रियांच्याच नावावर शिक्कामोर्तब करतील. अशा स्थितीत अजित पवार कोणते पाऊल उचलतील, याबद्दल तर्कवितर्क केले जात आहेत. सुप्रिया या पवारांच्या कन्या असल्याने पक्षातही त्या स्वीकारार्ह असतील. सुप्रियांना पवारांचेच पाठबळ असल्याने पक्ष वाढवणे शक्य होईल, असे म्हणतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.