Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार यांचे पुस्तक हे पोझिशनचा भाग; प्रकाश आंबेडकर

शरद पवार यांचे पुस्तक हे पोझिशनचा भाग; प्रकाश आंबेडकर 


कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीवरून देशातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान कर्नाटकातील निवडणूकीत भाजपचा पराभव झाल्यास दिल्लीत जागा मोकळी होईल, त्यामुळे सगळे आपापली पोझिशन घेऊन बसले आहेत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नुकतेच प्रसिध्द झालेलं पुस्तक देखील याचाच भाग असल्याचे आंबेडकर म्हणाले आहेत. 

देशातील राजकीय परिस्थितीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजप जर हरली तर दिल्लीतली पोस्ट ही मोकळी होते, तेव्हा सगळेजण आपापली पोझिशन करून बसले आहेत असं मी पाहतो. हे पुस्तक देखील एका पोझिशनचा भाग आहे असं मी याकडे बघतो असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन नुकतचं पार पडलं. या पुस्तकात त्या-त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांच्याकडून भाष्य करण्यात आलं आहे. त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल देखील या पुस्तकात भाष्य केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.