सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस यांचे मोठे गिफ्ट
राज्यातील अकरावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी लागू झालेली नव्हती. यासाठी शासनाने बक्षी समितीची नियुक्ती केली होती. या समितीने केलेल्या शिफारसी राज्य शासनाने स्वीकारल्या आहे. यामुळे आता अशा मुख्याध्यापकांना नवीन सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
कशी वाढणार वेतनश्रेणी
स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना ४४९००-१४२४०० ही वेतनश्रेणी मिळत होती. परंतु आता ४७६००-१५११०० ही वेतनश्रेणी लागू होणार आहे. म्हणजेच अकरावी, बारावीचे वर्ग असणाऱ्या मुख्याध्यापकांना इतर उच्च माध्यमिक प्रमाणे नुसार वेतन मिळणार आहे. या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळला आहे. पण या सुधारित वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक पदव्युत्तर पदवीधर व बी.एड असणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी
राज्य शासन राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोगानुसार थकबाकी मिळणार आहे. अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2016 ते 31 ऑक्टोंबर 2020 या कालावधीमधील सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे.
राज्य सरकारमधील कर्मचाऱ्यांनी आपल्याला सातवं वेतन आयोगानुसार पगार मिळावा यासाठी वेळोवेळी मागणी केली. कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यासाठी आंदोलने केली. अखेर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोगानुसार पैसे देण्याचा निर्णय घेतला.
शिंदे-फडणवीस सरकारचं कर्मचाऱ्यांना गिफ्ट
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक योजना लागू झाल्या आहेत. राज्य सरकारने गेल्या सहा ते सात महिन्यांत अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचं सातव्या वेतन आयोगाचा निर्णय आहे. राज्य सरकारने याआधी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसने प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.