Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

४० टक्के कमिशनमुळंकर्नाटकात जनतेनं भाजपला लाथाडलं

४० टक्के कमिशनमुळंकर्नाटकात जनतेनं भाजपला लाथाडलं


सांगली, दि. १३ : कर्नाटकात चाळीस टक्के कमिशनचं भाजप सरकार सामान्य जनतेने लाथाडलेलं आहे, आणि राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे सरकार बहुमताने सत्तेवर आणलेले आहे, अशी प्रतिक्रिया सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी कर्नाटकच्या निवडणूक निकालावर बोलताना दिली आहे. ते म्हणाले, गेली चार वर्षे भाजप हा पक्ष कर्नाटकमध्ये सत्तेवर होता, तिथे त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या कारकीर्दीत राज्याचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळेच कर्नाटकात भाजपचे कमळ कोमेजून पडले आहे.

ते म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जास्तीत जास्त जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा काढली होती. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, आणि त्यामुळे वातावरण निर्मिती चांगली तयार झाली होती. काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आणि राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांनी जास्तीत जास्त सभा घेऊन जनतेचा विश्वास निर्माण केला. या निवडणुकीचा महाराष्ट्रातसुद्धा चांगला परिणाम होणार आहे. अन्य काही राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही काँग्रेसच्यादृष्टीने एक नवे पर्व सुरू होईल, यात शंका नाही, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

काँग्रेस भवनसमोर जल्लोष

कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर येथील काँग्रेस भवनसमोर सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. गुलालाची उधळण केली, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी केली तसेच साखर वाटण्यात आली. काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.

यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, नगरसेवक मयुर पाटील, तौफिक शिकलगार, अमर निंबाळकर, मार्केट कमिटी सदस्य शशिकांत नागे, बिपीन कदम, कर्यधक्ष एन. डी. बिरनाळे, रविंद्र खराडे, सनी धोत्रे, आशिष कोरी, प्रशांत देशमुख, अयुब निशानदार, देशभुषण पाटील, संभाजी पोळ, सुहेल बलबंड, मौलाली वंटमोरे, पैगंबर शेख, अर्जुन मजले, राजेंद्र कांबळे, उत्तम सुर्यवंशी, माणिक कोलप, मनोज नांद्रेकर, सुलेमान मुजावर, अमोल पाटील, समीर मुजावर, साकिब मकानदार, अशिष चौधरी, अमित बस्तवडे, शरद चव्हाण, नामदेव पठाडे, मंदार काटकर, मारूती देवकर, गणेश कांबळे, डी.पी.बनसोडे, कांचान खंदारे, सभाजी पोल, अमोल पाटील, प्रकाश माने, बाबगोंडा पाटील, मुफित कोळेकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.