चहात गुंगीचे ओषध घालून जावयाने केला सासूवर केला बलात्कार
चहात गुंगीचं औषध मिसळून बेशुद्ध करत आपल्या सासूवर एका नराधम जावयाने बलात्कार केला आहे. सासूचे अश्लील फोटो काढून पुन्हा संबंध ठेवण्याची मागणीला नकार दिल्याने तिचे फोटो व्हायरल केले आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ही घटना कालिंजर येथे घडली आहे. येथील एका गावात राहणाऱ्या पीडितेच्या तक्रारीनुसार एक वर्षापूर्वी तिचा जावई अनिल हा तिच्या घरी आला होता. त्यामुळे पाहुणचार करण्याच्या हेतूने तिने त्याला चहा करून दिला. त्याने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. म्हणून पीडिता स्वयंपाकघरात पाणी आणण्यास गेली. त्या दरम्यान त्याने सासूच्या चहात गुंगीचं औषध मिसळलं. चहा प्यायल्यानंतर सासू बेशुद्ध झाली. त्यानंतर जावयाने तिच्यावर बलात्कार केला.समाजाच्या भीतीपोटी पीडितेने तक्रार केली नव्हती. पण, काही दिवसांनी तो पुन्हा घरी आला आणि त्याने पीडितेला बलात्कारावेळी काढलेले काही फोटो दाखवले. पुन्हा शारीरिक संबंध न ठेवल्यास हे फोटो व्हायरल करेन अशी धमकीही त्याने तिला दिली. यानंतर पीडितेने त्याला पोलिसात जाण्याचा इशारा दिला तरीही तो बधला नाही. त्याने तिचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल केले. त्यामुळे महिलेने पोलिसात तक्रार करण्याचं ठरवलं. मात्र, पोलिसांनी तिला दाद दिली नाही.
त्यामुळे महिलेने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने कालिंजर पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण जुनं असलं तरी न्यायालयीन आदेशावरून या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तपास पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती कालिंजर पोलिसांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.