खरंच वकिली शिकलात की कॉपी करून पास झालात; सुषमा अंधारे
बीड : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना तुम्ही वकिली शिकलात की कॉप्या करुन पास झालात, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नार्वेकरांवर सडकून टीका केली आहे.
बीडमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या समारोपाच्या सभेत बोलताना त्यांनी हे आरोप केले.
अंधारे म्हणाल्या, "कोर्टानं निरिक्षण नोंदवलं की नव्या लोकांनी अर्थात राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदारांवर निकाल द्यावा. पण जे राहुल नार्वेकर नैतिकतेच्या आणि कायद्याच्या बाता मारत आहेत. त्यांना मला प्रश्नविचारायचं आहे की, त्यांनी खरंच कायद्याची डिग्री घेतली आहे की आपण कॉप्या करुन पास झालात" नार्वेकरांना आता कळलं पाहिजे की जर कोर्टानं सांगितलं आहे की, त्यांनी नेमलेला व्हीप भरत गोगावले बेकायदा होता. जर व्हीप बेकायदा असेल तर त्यांनी मतदानासाठी काढलेला आदेशही बेकायदा ठरतो. जर हा आदेश बेकायदा असेल तर त्या आधारे झालेलं मतदान बेकायदा असेल. जर मतदान बेकायदा असेल तर त्यावर आधारित झालेलं बहुमत सिद्ध करुन अस्तित्वात आलेलं सरकार बेकायदा आहे, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.
जर कोर्टानं सरकार बेकायदा असल्याचं सांगत आहेत. तर यांनी गेल्या काही महिन्यात उधळलेला पैसा हे देखील बेकायदा आहे. पण असं असतानाही राहुल नार्वेकर रेटून खोटं बोलत आहेत. कदाचित नार्वेकर चुकीचा निकाल देतील, त्यानंतर पुन्हा आम्ही कोर्टात जाऊ त्यासाठी पुन्हा पाच-सहा महिने जातील. पण त्यानंतर जेव्हा हे लोक जनतेसमोर येतील तेव्हा मात्र यांची गाठ आपल्याशी असेल, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.