राजकीय संन्यासाची घोषणा करणारे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील पुन्हा सक्रिय !
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय संन्यासाची घोषणा करून काँग्रेस पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना भेटत त्यांनी जिल्ह्यातही संपर्क सुरु केला आहे, त्यामुळे त्यांचे बंधू विशाल पाटील आणि राजकीय प्रतिस्पर्धी खासदार संजय पाटील यांच्या समर्थकात चर्चा सुरु झालीय..
सांगली जिल्ह्यात बराच काळ माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांच्या घराण्याचे वर्चस्व राहिले. लोकसभेत बराच काळ वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवार विजयी झाला.2014 च्या मोदी लाटेत मात्र दादांचे नातू तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा भाजपा उमेदवार संजय पाटील यांनी पराभव केला, या पराभवानंतर ते खचले.2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तर त्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राजकीय संन्यास घ्यायची घोषणा केलीत्यानंतर सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली.यावेळी पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांनी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी केली, अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी निवडणूकीत रंगत आणली तरीही भाजपा उमेदवार संजय पाटील यांच्यापुढे त्यांचा टिकावं लागला नाहीसांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना सुद्धा चमत्कार होईल असे वाटू लागले आहे.याचाच भाग म्हणून की काय चार वर्षांपूर्वी राजकारण संन्यास घेतलेले प्रतिक पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते पून्हा लोकसभा निवडणूक लढवणार काय अशी चर्चा सुरु झाली आहे..प्रतीक पाटील यांच्या विन्रम स्वभावाचा त्यांना फायदा होतो, आगामी निवडणुकीत वसंतराव दादा पाटील घराण्यातील उमेदवार असणार हे नक्की, आजवर विशाल पाटील हेच उमेदवार असतील अशी चर्चा होती आता मात्र प्रतीक पाटील लोकसभा आणि विशाल पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील अशी चर्चा आहे..
प्रतीक पाटील यांच्या जमेच्या बाजू
वसंतदादा पाटील यांचे नातू
विनम्र स्वभाव
इंग्रजीवर प्रभुत्व
राजकारणात कोणाशीही कडवा विरोध नाही
देशभरातील काँग्रेस नेत्यांशी मैत्री
प्रतीक पाटील यांच्या कुमकुवत बाजू
जनसंपर्क अत्यंत कमी
मंत्री असताना स्वतःचा गट मजबूत करता आला नाही
वसंतदादा यांचा वारसा कॅश करता आला नाही.
जुना गट सांभाळता आला नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.