Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादीतून भाजपकडे जाणाऱ्यांची संख्या कमी; जयंत पाटील

राष्ट्रवादीतून भाजपकडे जाणाऱ्यांची संख्या कमी; जयंत पाटील 



मुंबई: शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय आज मागे घेतला. त्यांच्या भूमिकांचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विशेषतः अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांना ब्रेक लागावा, यासाठी पवारांनी खेळी केल्याचंही बोललं जातंय.

त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक विधान केल्याचे खळबळ उडाली आहे. 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांना एक विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी भाजपमध्ये जाणारे मर्यादित असतील, असं म्हटलं आहे.

अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असं पवारांनीच पुस्तकात लिहिलं आहे आणि आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला याचा अर्थ तुम्हाला जे करायचंय ते करा; असं पवारांना सूचित करायचं आहे का? असा प्रश्न जयंत पाटलांना विचारण्यात आला. जयंत पाटील उत्तर देतांना म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र माझ्यासमोर अशा भूमिका कुणीही व्यक्त केलेल्या नाहीत.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीला आज राज्यात विस्तारण्याची संधी आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडी ब्रेक व्हावी, असं कुणाला वाटत असेल तर त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.