पंच्याहत्तरी झाली ; घरी जाणार की काम करणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नव्या नेतृत्वाने निगुतीने हे धोरण राबवले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळाचे सदस्य करण्यात आले. बी. एस. येडियुरप्पा, आनंदीबेन पटेल यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले. ज्येष्ठ नेत्यांनी या नव्या भाजपशी जुळवून घेतले. त्यातल्या काही जणांनी राज्यपालपद स्वीकारले. काही नेते मात्र भाजप सोडून गेले. छत्तीसगडमधील नंदकुमार साई हे त्यातलेच एक. जनरल व्ही. के. सिंग, राधा मोहन सिंह, रमादेवी आणि इतर काही जणांना '२०२४च्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट तुम्हाला मिळणार नाही', असे आधीच सूचित करण्यात आले आहे.
परंतु लिंगायत नेते येडियुरप्पा यांच्याशिवाय पक्षाला कर्नाटकात लढा देणे शक्य होणार नाही हे लक्षात आल्याने नेतृत्वाची बरीचशी पंचाईत झाली. केंद्रीय निवडणूक समिती आणि सर्वशक्तिमान अशा संसदीय मंडळात येडीयुरप्पांना स्थान देऊन पक्षाने आपल्या धोरणाला काहीसा फाटा दिला. शिवाय त्यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख करण्यात आले. त्यांचे एक पुत्र आधीच लोकसभेचे सदस्य आहेत, आता दुसऱ्या मुलाला विधानसभेचे तिकीट देण्यात आले आहे. आपल्या जास्तीत जास्त पाठीराख्यांना तिकीट मिळेल याची काळजीही येडियुरप्पांनी घेतली आहे.थोडक्यात काय, तर येडियुरप्पांनी भाजपचे निवृत्तीचे धोरण जवळपास गाडून टाकले. २०२३ च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अन्य काही राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. कर्नाटकमध्ये जर भाजपला पराभवाचे तोंड पाहावे लागले, तर इतर राज्यांमध्ये पक्षाची डोकेदुखी वाढेल हे नक्की ! कर्नाटकात जनता दल एसचा धडा गिरवण्याचे पायलट यांच्या मनात आहे असे म्हणतात. त्यांच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही तिथे सरकार स्थापन करता येणार नाही, अशी चिन्हे आहेत. राजस्थानात २०० जागांच्या विधानसभेत पायलट यांच्या मनात जो राजकीय पक्ष काढावयाचा आहे त्याच्यासाठी तीसेक जागा मिळाल्या तरी भागेल. अर्थात, याबाबतीत अंतिम निर्णय अद्याप व्हायचा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.