कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद 'सीबीआय'चे नवे 'बाॅस'! कर्नाटकचे काँग्रेसचे किंग डीके शिवकुमारांनी त्यांच्याच अटकेची केली होती मागणी
कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद 'सीबीआय'चे नवे 'बाॅस'! कर्नाटकचे काँग्रेसचे किंग डीके शिवकुमारांनी त्यांच्याच अटकेची केली होती मागणी कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे विद्यमान प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद 25 मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सूद यांच्यावर भाजप सरकारला संरक्षण दिल्याचा डीके शिवकुमारांचा आरोप डीजीपी प्रवीण सूद मार्चमध्ये चांगलेच प्रकाशझोतात आले होते. कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिल्पकार झालेले डीके शिवकुमार यांनी त्यांच्यावर राज्यातील भाजप सरकारला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. शिवकुमार यांनी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा दावा करत पोलिस महासंचालक असलेल्या प्रवीण सूद यांच्याच अटकेची मागणी केली होती. आता तेच प्रवीण सूद सीबीआय संचालक झाले आहेत.'द हिंदू'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी आणि भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या पॅनलने निवड केली आहे. चौधरी यांनी सूद यांच्या शिफारशीविरोधात असहमत नोट सादर केली आहे. कारण ते सीबीआयच्या सर्वोच्च पदासाठी निवडलेल्या अधिकार्यांच्या मूळ पॅनेलमध्ये नव्हते आणि शेवटच्या क्षणी त्यांचा समावेश करण्यात आला होता.
सीबीआय संचालकांच्या नावांच्या निवडीसाठी पॅनेलची बैठक काल शनिवारी (13 मे) रोजी पार पडली. काल कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवत भाजपचा दारुण पराभव केला आहे. मोदी सरकारने सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही, ज्यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. दिल्लीत पदभार स्वीकारण्यापूर्वी ते महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक होते. प्रवीण सूद व्यतिरिक्त, इतर उमेदवारांमध्ये मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक सुधीर सक्सेना, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक महासंचालक ताज हसन यांच्याही नावाचा समावेश होता.
कोण आहेत प्रवीण सूद?
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली मधून अभियांत्रिकी पदवीधर आहेत सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे पोलिस अधिकारी आहेत. ते मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत. सूद यांची 2004 मध्ये म्हैसूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. 2007 पर्यंत ते पदावर होते. नंतर त्यांनी बंगळूर शहराचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आशित मोहन प्रसाद यांना हटवून त्यांची 2020 मध्ये कर्नाटकचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बंगळूर शहरात पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्था म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते बेल्लारी आणि रायचूरचे पोलिस अधीक्षक राहिले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.