जीप दुभाजकावर आदळून 2 ठार तर 1 गंभीर जखमी
कवठेमहांकाळ : रत्नागिरी – नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव (लांडगेवाडी) गावच्या हद्दीत जीप चालकाचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात शनिवारी (दि. १०) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपास जीप (क्र.MH03CM – 9597) ही कोल्हापूरकडून विजापूरकडे चालली होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गाडी नरसिंहगाव गावात उड्डाण पुलावर आली असता, गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्याच्या दुभाजकास जाऊन धडकली.हा अपघात इतका गंभीर होता की, गाडीत असलेल्या तिघांपैकी दोघेजण जागीच ठार झाले. एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे महंमद अरफील पठाण (वय ३०) आणि ईराणा सदाशिव हंगरगे (वय २४) दोघेही रा. अलमेल ता. सिंदगी जि. विजापूर अशी आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.