गुहागर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात, ट्रकची एसटी बसला जोरदार धडक, एक ठार, तर 23 जखमी
गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे काल (मंगळवारी) रात्री कर्नाटक सीमेलगत एसटीला ट्रकनं पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसचा मागील बाजूचा चक्काचूर झाला तर एकाचा मृत्यू झाला आहे, तर एसटीमधील जवळपास 23 प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातातील 12 जण गंभीर जखमी असून हा अपघात मंगळवारी साडेसातच्या सुमारास झाला.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगाराची सांगोला-विजयपूर बस ही विजयपूरला निघाली होती, तर साईराज ट्रान्सपोर्टचा ट्रक हा साखर भरून विजयपूरला निघाला होता. सांगोला- विजयपूर बस कर्नाटक "सीमेलगतच्या बसथांब्यावर प्रवासी उतरत होते. याठिकाणी तीव्र उतार आहे. पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. चालकाचा ताबा न राहिल्यानं ट्रकनं पाठीमागून एसटीला जोराची धडक दिली.
ट्रकची धडक इतकी जोराची होती की, एसटीत असणारे 23 प्रवाशी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. 23 जखमी प्रवाशांपैकी 13 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.