Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करजगीचा तलाठी दुसर्‍यांदा 50 हजारांची लाच घेतांना लाचलुचपतच्या जाळ्यात




बेकायदा वाळू साठ्याबद्दल कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपये लाच घेतल्याबद्दल करजगी (ता. जत) येथील तलाठी बाळासाहेब शंकर जगताप (वय 57 रा. आसंगी, गुडापूर रोड ता. जत) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी वाळू आणली आहे. तलाठी जगताप याने सदरचा वाळूसाठा बेकायदा असून त्याबद्दल कारवाई न करण्यासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्याबद्दल तक्रारदार यांनी 12 जून रोजी लाचलीचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला.

तक्रारीनुसार पडताळणी केली असता तलाठी जगताप याने तक्रारदाराने बेकायदा वाळू साठवणुक केली म्हणून कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी जगताप याच्या राहत्या घराजवळ सापळा लावला. तेव्हा तक्रारदाराकडून 50 हजार रुपये लाच रक्कम स्विकारली असता रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरीध्द उमदी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तलाठी जगताप याला यापूर्वी 2014 तक्रारदार यांच्या खरेदी दस्ताची नोंद घेवून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजार रूपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. तेव्हा त्याच्याविरूद मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दुसऱ्यांदा लाच घेताना पकडण्यात आले.

उपाधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अंमलदार प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सिमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.