इंदोरीकरांच्या अडचणी वाढणार; गुन्हा दाखल करण्याचे खंडपीठाचे आदेश
संगमनेर: प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना बेताल वक्तव्य करण भोवलं आहे. त्यांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. औरंगाबाद खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे.
इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी लिंगभेदावर भाष्य केले होते. मात्र, हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप करत त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्याच दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करावा म्हणून प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका करण्यात आली होती.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याला इंदुरीकर महाराजांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केल्याने इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला होता. या निर्णयाला याचिकाकर्ते ऍड. रंजना गवांदे यांनी वकील जितेंद्र पाटील यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला असे याचिकाकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. जिल्ह्यातील राजकीय ज्येष्ठ नेते इंदोरीकर यांच्या घरी जाऊन सत्कार करत होते. यामुळे हा सामाजिक कार्यकर्त्यांची ऊर्जा काढून घेण्याचा प्रयत्न होता. मात्र, आम्ही खचून न जाता न्याय व सत्यासाठीची लढा सुरुच ठेवला होता, असे अंनिसच्या राज्य सचिव ऍड. रंजना गवांदे म्हणाल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.