🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंगपरिवर्तन

माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंगपरिवर्तन


कोलकाता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची मुलगी सुचेतना भट्टाचार्य यांनी लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करून सुचेतन भट्टाचार्य होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनेक वर्षांपासून एलडीबीटीक्यू समुदायाशी जुळल्या आहेत. यासंदर्भात सुचेतना म्हणाल्या, मी शरीराने महिला असली, तर मानसिकृष्ट्या पुरुष आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यावरून मला दररोज समाजाकडून मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अखेर मी माझ्या इच्छेनुसार लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेबाबत मी कायदेविषयक आणि मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्ला घेत आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, ही बाब महत्त्वाची नसून स्वतःच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे. माझे वडीलही मला या निर्णयाबाबत पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.