Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाणी टंचाई थोडे सहकार्य थोडे नियोजन! पाणी फुलवे आपले जीवन ! उपसा बंदी आदेश

पाणी टंचाई थोडे सहकार्य थोडे नियोजन! पाणी फुलवे आपले जीवन ! उपसा बंदी आदेश


सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली, कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली,

पाणी टंचाई थोडे सहकार्य थोडे नियोजन! पाणी फुलवे आपले जीवन !

*उपसा बंदी आदेश*

सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील (भू बरंज ते म्हसाळ को.प.बंधारा हद्दीपर्यंत) लाभधारकांना कळविण्यात येते कि, रब्बी / उन्हाळी हंगामातील पाणी वापर / उन्हाळ्याची तीव्रता त वारणा- कोयना धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. त्यामुळे कोयना धरणातून सिंचन व बिगरसिंचनासाठी लागणा-या पाणी वापरात कपाल अपरिहार्य आहे.

सद्यस्थितीस कोयना व वारणा धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता, पावसाळयापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक असल्याने, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६. कलम १९, ४९, (छ) मधील तरतुदीनुसार खाली नमूद केलेल्या कालावधीमध्ये कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणा-या सर्व योजनावर जसा बंदी आदेश जारी करण्यात येत आहे. (पिण्याचे पाणी पुरवठा करणा-या योजना सुरू राहतील.)

*उपसा बंदीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे.*

दिनांक १४/०६/२०२३ ते १७/०६/२०२३   उपसा बंदी

दिनांक १८/०६/२०२३ ते २०/०६/२०२३ उपसा कालावधी
पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करणेत येईल.

उपरोक्त कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनअधिकृत समजून संबंधीतांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करणेत येईल, याची गांर्भीयाने नोंद घेवून उपलब्ध होणा-या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त ऊभ्या पिकांचे नुकनास होऊ नये, या दृष्टिने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

तसेच धरणातील मर्यादित पाणी साठयाचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यानी सांडपाणी / औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबधीतानी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळणेस सहकार्य करावे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.