पैशासाठी डॉक्टरांनी विकलं नवजात लेकरू
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशासाठी डॉक्टरांनी नवजात शिशुला विकल्याची घटना घडली आहे. बलात्कार झालेल्या एका पिढीत तरुणीला लेकरू झालं होतं. या बाळाला डॉक्टरांनी विकलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांना अटक केली आहे.
आशिक राशिद बराडे या आरोपी डॉक्टरांनी बनावटी डिलिव्हरी रेकॉर्ड आणि जन्मपत्र तयार करून या नवजात शिशुला विकलं आहे. या बाळाला जन्म देणारी आई बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आहे. 2017 ते 2022 यादरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर ती तरुणी गर्भवती राहिली होती. डॉ. आशिक बराडे यांच्या नर्सिंग होममध्ये तिने एका मुलीला जन्म दिला होता. मुलीची प्रकृती ठीक नाही, असं डॉक्टरनं पीडित तरुणीला सांगितलं होतं. त्यानंतर डॉ. आशिकनं खोटे रेकॉर्ड तयार करून बाळाला विकलं.
डॉ. आशिक यांनी केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस तपासामध्ये ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी लगेचच आशिक विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आणि त्याला अटक केली. दरम्यान, नवजात शिशु विकण्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मदतीने ही लोक हे कृत्य करतात, असं म्हटलं जातं. मात्र, सध्या घडलेल्या प्रकरणामध्ये डॉक्टरांनीच हे लज्जास्पद कृत्य केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.