Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील ९ उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत बदल, १० जणांच्या बदल्या

राज्यातील ९ उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत बदल, १० जणांच्या बदल्या


मुंबई : राज्य शासनाने राज्यातील ९ पोलिस उपअधीक्षकांच्या पदस्थापनेत अंशतः बदल केले आहेत तर १० जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरच्या उपअधीक्षकपदी रोहिणी साळुंखे यांची बदली करण्यात आली आहे. सध्या त्या सावंतवाडी येथे उपअधीक्षकपदावर कायर्रत आहेत. 

दिनकर डांबळे यांची भूम येथून परभणी शहर येथे बदली करण्यात आली आहे. वधार् येथील आथिर्क गुन्हे शाखेचे उपअधीक्षक आबुराव सोनवणे यांची मुंबईत सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील शंकर काळे यांची महाड येथे बदली करण्यात आली आहे. मुंबईतील राज्य गुप्तवातार् पथकाकडील धनंजय येरूळे यांची पाचोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहरकडील अशोक राजपुत यांची पनवेल येथे बदली करण्यात आली आहे. 

सोलापूर शहरातील माधव रेड्डी यांची नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बदली करण्यात आली आहे. नागपूर शहरकडील पुंडलिक भटकर यांची कामठी येथे बदली करण्यात आली आहे. कणकवली येथील विनोद कांबळे यांची मुंबई शहरचे सहायक पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तुळजापूर येथील सई भोरे-पाटील यांची अकलूजच्या उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. 

नवी मुंबई येथील विनीतकुमार चौधरी यांची रत्नागिरी येथे पदस्थापना करण्यात आली आहे. योगेश गावडे यांची नवी मुंबईचे सहायक पोलिस उपायुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. चांदूर रेल्वेकडील संजय महाजन यांची नंदूरबार येथे पदस्थापना करण्यात आली आहे. नंदूरबार येथील श्रीकांत डिसले यांची छत्रपती संभाजीनगर येथील महामागर् सुरक्षा पथकाकडे पदस्थापना करण्यात आली आहे. देऊळगाव राजा येथील विलास यामावार यांची अक्कलकोटचे उपअधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे. पाचोरा येथील संदीप गावीत यांची यांची जळगाव शहरकडे पदस्थापना करण्यात आली आहे. ठाणे शहरकडील कल्याण घेरे यांची कल्याण येथे पदस्थापना करण्यात आली आहे. साक्री येथील साजन सोनवणे यांची धुळे येथे पदस्थापना करण्यात आली आहे. वधार् येथील सचिन सांगळे यांची जालना शहरकडे पदस्थापना करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.