कॉंग्रेसचा भाजपला पहिला धक्का ! कर्नाटकातील धर्मांतर विरोधी कायदा रद्द..
नवी दिल्ली: कर्नाटकमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर भाजपने मंजूर केलेला धर्मांतर विरोधी कायदा कॉंग्रेस सरकारने रद्द ठरविला आहे. तसेच मंत्रिमंडळाने इतिहास विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याला परवानगी दिली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीबाबतचाही कायदा बदलण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे विधी आणि संसदीय कार्यमंत्री एचके पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
कॅबिनेट मंत्री पाटील मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हणाले की, कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी तत्कालीन भाजप सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या संदर्भात एक विधेयक मांडण्यास मंजुर दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय स्वयंसवेक संघाला वैचारीक अधिष्ठान देणाऱ्या विनायक दामोदर सावरकर आणि केशव हेडगेवार यांच्यावर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेला धडाही काढून टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. या दोघांवरील धडा मागच्यावर्षी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. याशिवाय भाजपाने अभ्यासक्रमात जे-जे बदल केले आहेत, ते हळूहळू वगळण्यात येतील, असेही त्यांनी सांगतिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.