सांगलीवासीयांनो सतर्क रहा,अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली
औरंगजेब व टिपू सुलतान स्टेटसवरून मिरज, कुपवाड सांगलीतील अशा तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अत्यंत सतर्क आहेत काही ठिकाणी आणखी असे प्रकार उघडकीस किंवा समोर येण्याची शक्यता आहे पण पोलीस सोशल मिडियावर बारीक लक्ष ठेवून असल्याने तातडीने घटना उघडकीस येत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करीत पोलीस अत्यंत सतर्क असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.