मेहुणीनं लग्नात नवरदेवाला विचारला प्रश्न, उत्तर दिलं नाही तर मांडवातच मोडलं लग्न
गाजिपूर: देशाचे पंतप्रधान कोण, असा प्रश्न मेहुणीनं मांडवात नवर देवाला विचारला. नवरदेवाला नरेंद्र मोदी यांचे नाव सांगता आलं नाही. त्यामुळं नवरदेव हा मंदबुद्धीचा आहे, असं सांगत नवरी मुलीनं विवाह मोडल्याचा धक्क्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशात नरसीपूर गावात मोडलेल्या या लग्नाची चर्चा सध्या सगळीकडं आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. या मुलीच्या नातेवाईकांनी नवरदेवाच्या धाकट्या भावासोबत या मुलीचं लग्न लावून दिलंय. तो मुलगा अल्पवयीनं असल्याचं नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होतं, त्यावर बंदुकीचा धाक दाखवत हे लग्न लावण्यात आलंय. त्यानंतर प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचलंय.
नेमका काय घडला प्रकार
नरसीपूर गावात राहणाऱ्या शिवशंकर राम याचं लग्न बसंत पट्टी या ठिकाणी राहणाऱ्या एका मुलीशी ठरलं होतं. हिंदू परंपरेप्रमाणं 11 जूनचा मुहुर्त काढण्यात आला होता. शिवशंकर आणि त्याचे नातेवाईकही वरात घेऊन मुलीच्या घरी गेले. तिथं हिंदू परंपरेनं हा विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी काळी काही पूजाविधी होते. त्यावेळी मेहुण्यांनी या नवरदेवाला हसतखेळत काही प्रश्न विचारले. यात नवरीच्या धाकट्या बहिणीनं देशाच्या पंतप्रधानांचं नाव त्याला विचारलं. बराच वेळ घेतल्यानंतरही नवरदेवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव सांगता आलं नाही. वधूच्या कुटुंबीयांना शिव शंकरचं हे अज्ञान अपमानकारक वाटलं. शिव शंकर हा मंदबुद्धी असल्याचा दावा करत हे लग्न तिथचं मोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
बंदुकीचा धाक.
त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत या मुलीचा विवाह याच शिव शंकरच्या धाकट्या भावाशी लावून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. हा मुलगा लग्नाच्या वयाचा नसल्याचं नवरदेवाच्या वडिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीच्या धाकावर हे लग्न मोडण्यात आलं. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचलं.
आता पोलीस करणार चौकशी
सध्या तरी या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तक्रार आल्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. पंतप्रधानांचं नाव सांगता आलं नाही म्हणून लग्न मोडलं, असं सांगत एक तरुण पोलीस ठाण्यात आला होता, असं पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना बोलावून त्याला परत पाठवण्यात आलं. याबाबत लेखी तक्रारीनंतर पुढील तपास करणार असल्याचं पोलिसी खाक्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.