'महाराष्ट्र शासन' लिहिलेल्या वाहनांचा सर्रास वापर
महाराष्ट्रातील संपूर्ण अधिकारी व त्यांच्या अधिनस्थ येत असलेलया विभिन्न विभागांतील अन्य खाते वाहनांवर नियमबाह्य महाराष्ट्र शासन लिहून वाहने चालविली जात आहेत. अशा वाहनांची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाधिकारी व त्यांच्या अधिनस्त येत असलेल्या सर्वच विभागांतील अधिकार्यांना त्याचे खाते वाहनावर महाराष्ट्र शासनाकडून अथवा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून (आरटीओ) महाराष्ट्र शासन लिहिण्याची कोणतीच मुभा देण्यात आलेली नाही. असे असतानाही नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्र शासन लिहून खाते वाहने मार्गस्थ करण्यात येत आहेत. ही बाब न्यायसंगत नसून मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन करणारी आहे.
राजशिष्टाचार विभाग (सामान्य प्रशासन विभाग), महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत सर्व जिल्हाधिकारी (मुंबई व मुंबई उपनगर वगळून) कार्यालयाला अतिविशिष्ट मान्यवरांच्या परिवहन व्यवस्थेकरिता असलेले डीव्ही वाहने उपलब्ध करून दिली आहेत. त्याच डीव्ही वाहनाच्या पुढील व मागील बाजूस ठळकपणे महाराष्ट्र शासन असे लाल रंगाने रंगवून घेण्याची मुभा देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त शासनाच्या कोणत्याही अन्य खाते वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहिता येत नसल्याचे नियमावलीत नमेद करण्यात आले आहे. Maharashtra नियमांच्या अनुषंगाने चौकशी व कार्यवाहीसाठी महाराष्ट्रतील प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना त्यांच्या स्वाक्षरीसह आदेशित करून त्यांच्या कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत शासनाच्या खाते वाहनावर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आढळल्यास अशा वाहनांवर मोटारवाहन कायदा व नियमाअंतर्गत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, असेही सुज्ञ नागरिकांचे म्हणने आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.