ऊसाच्या शेतीचे नुकसान करणाऱ्यां माकडीनीची गोळी झाडून केली हत्या
सागंली : ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीला बंदुकीची (एअरगन) गोळी घालून हत्त्या करण्याचा प्रकार शनिवारी बिऊर (ता.शिराळा) येथे उघडकीस आला. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून वन कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता संशयितांने पलायन केले.
याबाबत माहिती अशी की, फोनवरून एका माकडीनीला मारल्याची बातमी वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळाली. यावरून वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक विशाल दुबल, संपत देसाई यांनी घटनास्थळी भेट घेतली.
मयत माकडीनीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिथुन गुरव यांनी शवविच्छेदन केले. पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. माकडांमुळे ऊस क्षेत्राचे नुकसान होत आहे म्हणून एअर गन ने माकडीनीला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर संशयित अमित माने पळून गेला आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून उपवनसंरक्षक निता कट्टे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनक्षेत्रपाल महंतेश बगले हे करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.