शरीरासाठी आरोग्यदायी सैंधव, काळे मीठ सांगलीत मार्केट यार्ड समोर विक्रीस आले आहे .
उत्तर भारतामध्ये सिंध प्रांतातील सैंधव मीठ व काळे मीठ म्हणून प्रसिध्द असणारे खडा मीठ आरोग्यासाठी अत्यंत चांगले मानले जाते. सांगलीतील रस्त्यावर विक्रीला आलेले दिसत आहे. माणसाच्या शरीरात सोडियम युक्त, केमिकल युक्त मिठ मोठ्या प्रमाणात वापरले असल्यामुळे त्यांना अनेक आजार जडत आहेत. बीपी शुगर रुग्णांना डॉक्टर मिठ तुम्ही खावा असे सांगतात.
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डच्या समोर राजस्थान येथील व्यक्तीने ट्रॅक्टर भरून काळे मीठ व सैंधव मिठाचे खडे विक्रीसाठी आणले आहेत. काळे मीठ हे सिंध प्रांतातून येते त्याचा दर किलोला पन्नास रुपये तर काळे मीठ हे राजस्थान मधून विक्रीसाठी आणले जाते त्याचा दर केलेला साठ रुपये असा आहे. सैंधव मीठ विविध उपचारात गुणकारी मानले जाते हे रक्तदाब ,मधुमेह ,मुतखडा, सांधेदुखी व शारीरिक व्याधीसाठी उपयोगी असल्याचे सांगतात तर काळे मीठ हे गॅस, अपचन ,बुद्धकोष्टता, खोकला यासाठी आयुर्वेदामध्ये वापरले जाते. मात्र त्याची कल्पना शहरातील मोठ्या लोकसंख्येला नव्हती. डॉक्टरांकडून सैंधव आणि काळे मीठ खाण्याचा सल्ला दिलेले ग्राहक त्याचा शोध घेत असतात.
मानवाच्या शरीरासाठी आरोग्यदायी मीठ-
आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सचिन पवार म्हणाले सैंधव मीठ हे शरीरासाठी चांगले असते. काळे मीठ आपल्या भागात कमी मिळते. पण सैंधव व काळे मीठ आरोग्यासाठी चांगले असून त्याचा वापर आरोग्यदायी आहे. सोडियमयुक्त, केमिकल मिठाचा वापर आहारामध्ये नागरिकांनी कमी करावा असे डॉक्टर पवार यांनी सांगितले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.