Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सिरियल पाहणार्‍या पत्नीने टीव्ही बंद करण्यास दिला नकार; पतीने थेट गोळीच झाडली

सिरियल पाहणार्‍या पत्नीने टीव्ही बंद करण्यास दिला नकार; पतीने थेट गोळीच झाडली 


लखनऊ 11 जून : पती आणि पत्नीमध्ये लहान मोठ्या कारणांवरुन वाद सुरुच असतात. मात्र अनेकदा हे वाद अतिशय भयानक रूप धारण करतात आणि याचा शेवट हादरवणारा असतो. उत्तर प्रदेशातील रामपूरमधून पती-पत्नीमधील वादाचं एक खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे.

येथे महिला टीव्ही सीरियल पाहत होती. दरम्यान, मद्यधुंद पतीने तिला टीव्ही बंद करण्यास सांगितल्यावर वाद झाला. यावर त्याने परवाना असलेली बंदूक काढून गोळी झाडली. हे प्रकरण रामपूरच्या स्वार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समोदिया गावाशी संबंधित आहे. येथे श्यामलाल आपल्या कुटुंबासह राहतो. शुक्रवारी त्याची पत्नी घरी मालिका पाहत होती. यावर त्याने टीव्ही बंद करण्यास सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान श्यामलाल इतका संतापला की त्याने परवाना असलेली बंदूक काढून गोळीबार केला, गोळी महिलेच्या उजव्या हाताला लागली.

यानंतर तो फरार झाला. घाईघाईत नातेवाईकांनी महिलेला शासकीय रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिला हायर सेंटरमध्ये रेफर केलं. याप्रकरणी महिलेच्या मुलाने स्वार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केलं आहे.

यासोबतच पतीला बंदुकीसह अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृतीही स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संसार सिंह यांनी सांगितलं की, पीडितेच्या मुलाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. यासोबतच आरोपीला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.