Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आई वडिलांच्या सडलेल्या मृतदेहाजवळ सापडले चार दिवसांचे जिवंत बाळ

आई वडिलांच्या सडलेल्या मृतदेहाजवळ सापडले चार दिवसांचे जिवंत बाळ


उत्तराखंडमधील डेहराडून शहरातून एक धक्कदायक घटना समोर आले आहे. डेहराडुनमधील सांगरा चौकातील एका घरात पती व पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. या दोघांचाही तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब अशी की या दाम्पत्याचे चार दिवसांचे बाळ त्या मृतदेहाशेजारीच होते. पोलिसांनी त्या बाळाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

मोहतशिम (25) व अनम(22) अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावं असून ते चलहोली भागातील एका भाड्याच्या घरात राहत होते. अनमने काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. मोहतशिम याचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी नुसरत हिच्यापासून त्याला एख पाच वर्षांचा मुलगा आहे.

मोहतशिम व नुसरत यांचे 10 जून रोजी अखेरचे बोलणे झाले होते. पाच लाख रुपये घेऊन तो गावी येत असल्याचे त्याने तिला कळवले होते. मात्र तेव्हापासून तो फोनच उचलत नसल्याने व नंतर त्याचा फोन बंद पडल्याने नुसरत स्वत: त्याच्या घरी पोहोचली. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने व घरातून घाणेरडा वास येत असल्याने तिने याबाबत तत्काळ तिच्या दिराला व सासऱ्यांना कळवले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत कळवले. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दरवाजा तोडला.

दरवाजा तोडून आत आल्यानंतर घरातील दृष्य अत्यंत भयंकर होते. मोहतशिम व अनम यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात पडले होते. त्यांच्या तोंडातून व शरीरातून रक्त बाहेर पडल्याने संपूर्ण घरात रक्त पसरलं होतं. तर बेडरुममध्ये त्यांचे पाच दिवसांचे बाळ झोपलेले होते. पोलिसांनी तत्काळ त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले. मोहतशिम व अनम यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना सध्या आत्महत्येचा संशय येत असून शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.