कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः शिवाजी चौकात
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करत आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृहविभागाकडून कोल्हापूर पोलिसांना तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याला निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी स्वतः शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आहेत.
दुसरीकडे, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमल्या. पोलिसांकडून ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, संघटना रॅली काढण्यावर ठाम होत्या. पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही. यानंतर पोलीस आणि संघटनांमध्ये बाचाबाची झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.
पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी रस्त्यावर चपलांचा ढीग पडला होता. दरम्यान, पोलिसांनी शिवाजी चौकातील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, मनपा शिवाजी चौक भागातील बहुंताश भाग चिंचोळ्या रस्त्यांचा आहे. त्यामुळे देऊन पांगवलं. शहरातील पान लाईन, महाद्वार रोड, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला पांगवतानाच प्रत्येक चौकात फौजफाटा तैनात केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.