Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुजाऱ्याने प्रेयसीचा जीव घेतला आणि मृतदेह मंदिराच्या मागे पुरला

पुजाऱ्याने प्रेयसीचा जीव घेतला आणि मृतदेह मंदिराच्या मागे पुरला


हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुजार्‍याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराच्या मागे पुरला आहे. साई कृष्ण नावाचा पुजारी आणि अप्सरा नावाच्या मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. मोठी गोष्ट म्हणजे पुजारी साई कृष्ण विवाहित आहे आणि त्यांना एक मूल असल्याचेही समजत आहे.

हे प्रकरण हैदराबादमधील शमशाबादजवळील नारकुडा गावाशी संबंधित आहे. हत्येचा उलगडा झाल्यानंतर अप्सराच्या नातेवाईकांनी अप्सरा गर्भवती असल्याचे पोलिसांना सांगितले. साई कृष्णाने तिचा गर्भपातही केला होता. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार, अप्सरा पुजाऱ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या कारणावरून साई कृष्णाने कट रचून तिची हत्या केली आहे.

अप्सरा प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायची

पुजारी म्हणून काम करणारा साई कृष्ण हा शरूरनगर परिसरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की, नारकुडा गावात राहणारी 30 वर्षीय अप्सरा एका खासगी कंपनीत काम करायची. पोलिसांनी सांगितले की, अप्सरा साई कृष्णासोबत सुल्तानपल्ली येथील गोशाळेत गेली आणि तिथे कृष्णाने तिची हत्या केली. हत्येनंतर साई कृष्णाने अप्सराचा मृतदेह मंदिराच्या मागे पुरला. विशेष म्हणजे मारेकरी साई कृष्णाने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन अप्सरा हरवल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांसमोर पुजाऱ्याने गुन्ह्याची कबुली दिली

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि साईकृष्णाची चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर खुनाचा गुन्हा कबूल केला. आता हैदराबाद पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाचे रुपांतर खुनाच्या प्रकरणात करून तपास सुरू केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.