ज्वेलर्सची गोळ्या झाडून हत्या, घटना CCTV मध्ये कैद
पंजाबच्या मोगामधील रामगंज मंडीमध्ये सोमवारी दुपारी 5 हल्लेखोरांनी एका ज्वेलर्सची गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोर ग्राहक म्हणून शोरूममध्ये पोहोचले होते. किती सोनं लुटलं गेलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळून गेले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संतप्त लोकांनी ठिय्या आंदोलन केले.
सोमवारी दुपारी 2.15 वाजता रामगंज येथील एशिया ज्वेलर्समध्ये 5 ग्राहक आले. त्यांनी सोन्याचे दागिने दाखवण्यास सांगितले. ज्वेलर्स विकीने त्यांना दागिने दाखवले. यानंतर त्यांनी बिल तयार करण्यास सांगितले. विकी बिल काढण्यासाठी वळला असता पैसे देण्याऐवजी दरोडेखोरांनी विकीवर गोळी झाडली. गोळीचा आवाज येताच बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. आजूबाजूचे दुकानदार आणि लोक जमू लागले. हे पाहून दरोडेखोरांनी त्यांना आवडलेले दागिने घेऊन पळ काढला. एसएसपी म्हणाले की, दरोडेखोरांनी किती रक्कम नेली हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.