Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1 वर्षाच्या मुलाना जरूर शिकवा या सवयी

1 वर्षाच्या मुलाना जरूर शिकवा या सवयी 


मुलांच्या मानसिक विकास आणि आरोग्यासाठी पालकांनी त्यांना लहानपणापासून काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. एका वर्षाच्या मुलाला त्याच्या भावना आणि त्याला नक्की काय बोलायचे आहे हे कळत नाही. मात्र काही मुलं अशी असतात ज्यांना एका वर्षातच त्यांना कशासाठी होकार द्यायचा आणि नाही हे कळते. पण त्यांना योग्य-अयोग्य कळत नाही. मुलांन वेळीच शिस्त लावली तर ते घरातील मंडळींसोबत नातेवाईकांशी सुद्धा उत्तम वागतात. याचा एकूणच सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यामुळे 1 वर्षाच्या मुलाला पालकांनी नक्की कोणत्या गोष्टी शिकवाव्यात हेच जाणून घेऊयात. 

मुलाचे रूटीन तयार करा 

मुलांसाठी प्रत्येक दिवसाचे एक रूटीन तयार करा. यामुळे मुलं आपल्या उत्तम भविष्यासाठी तयार होतात. त्यांना हे कळू लागते की, त्यांनी काय केले पाहिजे.त्याचसोबत मुलांचे झोपण्यापासूनचे ते खाण्याचे टाइम रूटीन तयार करा.

मुलांचे रोल मॉडल व्हा 

आजूबाजूला असणाऱ्यांना पाहूनच मुलं तसेच वागतात. अशातच पालकांनी सुद्धा आपली वागणूक नेहमीच उत्तम ठेवावी. मुलांच्या समोर भांडण करू नका. याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

काही मर्यादा तयार करा 

एका वर्षाचे मुलं लहान असतात. त्यामुळे त्यांना काय चुक-बरोबर हे कळत नाही. लहान मुलांना नेहमीच नव्या गोष्टी शिकण्याची फार आवड असते. मात्र नव्या गोष्टी शिकताना त्यांच्यासोबत काहीही चुकीचे होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी मर्यादा तयार करा.

सतत नकार देऊ नका 

मुलांना जर एखादी नवी गोष्ट करायची असेल तर त्यांना ती करू द्या. जेणेकरून ते नव्या गोष्टी शिकतील. त्यामुळे मुलांना काही करण्यासाठी सतत नकार देऊ नका.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.