कर्नाटकाच्या 6 न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी
बंगळुरू: महाराष्ट्रावर हल्ला करण्याच्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, बिहारचे मुख्मंत्री नितीशकुमार यांना दिलेल्या धमक्यानंतर मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) मुरलीधर यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअपवर कॉल आणि मेसेज करून ही धमकी दिली आणि 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. फोन करणार्याने पाकिस्तानी बँक एबीएल अलाईड बँक लिमिटेडचा खाते क्रमांकही दिला आणि पैसे जमा न केल्यास दुबईची गँग न्यायाधीशांची हत्या करेल, असे सांगितले. हे भारतीय शूटर्स आमचेच शूटर्स आहेत, असे म्हणत कॉलरने पीआरओसोबत काही क्रमांकही शेअर केले. पीआरओने सांगितले की, 12 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता फोन आला होता. धमकीचा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत पाठवण्यात आला होता. पीआरओने याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, एचटी नरेंद्र प्रसाद, अशोक निजगन्नावार, के नटराजन आणि वीरप्पा अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या न्यायाधीशांची नावे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.