Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खूशखबर! आता ईपीएफवर 8.15 टक्के व्याज

खूशखबर! आता ईपीएफवर 8.15 टक्के व्याज


नवी दिल्ली : एम्प्लाॅइज प्राॅव्हिडंड फंड ऑर्गनायजेशन अर्थात 'ईपीएफओ'चे सदस्य असलेल्या नाेकरदार वर्गाला सरकारने खूशखबर दिली आहे. यात जमा निधीवर सरकारने ८.१५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली. ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ राेजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला हाेता. सरकारने ताे मंजूर करीत सर्व विभागीय कार्यालयांना ८.१५% या दराने सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याचे निर्देश दिले. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात व्याजदर ८.१०% हाेता. १९७७-७८ या वर्षानंतरचा हा सर्वांत कमी व्याजदर हाेता.

किती व्याज मिळणार?

जुन्या आणि नव्या दराने मिळणारे व्याज उदाहरणार्थ समजून घेऊ या.

जमा ८.१०% ८.१५%

रक्कम दर व्याज दर व्याज

₹१ लाख ₹८,१०० ₹८,१५०

₹३ लाख ₹२४,३०० ₹२४,४५०

₹५ लाख ₹४०,५०० ₹४०,७५०

आतापर्यंतचे चढउतार

वर्ष व्याजदर

१९५२-६६ ३ ते ४.७५%

१९६७-७५ ५ ते ७%

१९७६-८३ ७.५० ते ८.७५%

१९८४-८९ ९.२५ ते ११.८०%

१९९०-९९ १२%

२०००-०१ ११%

२००१-०५ ९.५०%

२००६-१० ८.५० ते ९.५०%

२०११-२१ ८.२५ ते ८.५०%

२०२१-२२ ८.१०%

२०२२-२३ ८.१५%

६ काेटींपेक्षा जास्त सदस्य ईपीएफओचे देशभरात आहेत. ८.१०% व्याजदर २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिले हाेते. १२% हा सर्वाधिक व्याजदर १९८९-२००० या काळात होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.