Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक! भाजप नेत्याची अदिवासी तरूणावर लघवी; देशभर संताप

संतापजनक! भाजप नेत्याची अदिवासी तरूणावर लघवी; देशभर संताप 


मध्य प्रदेशमधून एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. सीधी जिल्ह्यातील भाजप नेते प्रवेश शुक्ला यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नशेच्या अवस्थेत तो एका आदिवासी तरुणावर लघवी करत आहे. हे प्रकरण समोर येताच भाजपने शुक्ला यांच्याविरोधात कडक पावलं उचलली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोपीवर एनएसए अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवेश शुक्ला हे भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचे माजी आमदार प्रतिनिधी असल्याची माहिती आहे. त्याचा हा व्हिडिओ 9 दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सिधी जिल्ह्यातील कुबरी बाजारचा आहे. येथे एक मानसिक पीडित आदिवासी तरुण बसला होता. प्रवेश शुक्ला याने नशेच्या अवस्थेत त्याच्यावर लघवी केली. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला.

घटनेनंतर काँग्रेस आक्रमक या घटनेवर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ म्हणाले, या घटनेने संपूर्ण मध्यप्रदेशची मान शरमने खाली गेली आहे. सिधी जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणावर लघवी करतानाचा क्रूरतेचा व्हिडिओ समोर आला आहे. आदिवासी समाजातील तरुणांसोबत अशा घृणास्पद आणि हिन कृत्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. दोषीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मध्यप्रदेशातील आदिवासींवरील अत्याचार थांबवावेत, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. भाजपकडून हात वर दुसरीकडे, टीकेची झोड उठल्यानंतर भाजपने प्रवेश शुक्ला यांचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. भाजपचे प्रवक्ते आशिष अग्रवाल यांनी सांगितले की, प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीचा भारतीय जनता पक्षाशी कोणताही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष आदिवासी समाजाच्या विरोधात केल्या जाणाऱ्या प्रत्येक घृणास्पद कृत्याला नेहमीच विरोध करेल.

मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. दोषीला कोणत्याही किमतीत सोडले जाऊ नये, अशा सूचना आपण प्रशासनाला दिल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. कठोर कारवाई करावी. तसेच दोषीवर ए एन एस लादण्यात यावे. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिधीच्या अतिरिक्त एसपी अंजुलता पटेल यांनी सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही तपास करत आहोत की या व्हिडिओमध्ये कोण आहे? मात्र, प्रवेश शुक्ला याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 294 आणि 504 अन्वये बिहारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी, एसी/ एसटी कायद्याचे कलम 3(1)(r)(s) देखील लागू करण्यात आले आहे.

भाजपकडून घटनेचा निषेध भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी थेट या घटनेवर ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले- मी सिधी जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करतो. मध्यप्रदेशातील गुन्हेगारांना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर कारवाई आणि NSA लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार केदारनाथ शुक्ला म्हणाले, माझा प्रतिनिधी नाही या प्रकरणाबाबत आमदार केदारनाथ शुक्ला स्वतः मीडियासमोर आले.  बोलताना केदारनाथ शुक्ला यांनी प्रवेश शुक्ला हा प्रतिनिधी असल्याचं फेटाळून लावलं आहे. प्रवेश शुक्ला हा माझा प्रतिनिधी नाहीत, असे आमदार म्हणाले. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. कठोर कारवाई करण्याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.