Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पलूस मध्ये विद्यार्थ्याच्या दोन गटात तूफान राडा; दोनजण गंभीर जखमी

पलूस मध्ये विद्यार्थ्याच्या दोन गटात तूफान राडा; दोनजण गंभीर जखमी 


पूर्वी झालेल्या वादातून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला. एका गटाने कुर्‍हाडीने व लोखंडी पाईपने केलेल्या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. सोहम संजय पाटील (19), वेदांत संतोष फाळके (17, रा. मायाक्का मंदिर जवळ पलूस) अशी जखमींची नावे आहेत.

वैभव ऊर्फ गुंडा कोळी,अभिजित तांबारे, श्री मोहिते, पार्थ मोहिते, किरण निकम, ओंकार कदम (सर्व रा. महादेव मंदिर परिसर, पलूस) अशी संशयितांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जखमी सोहम पाटील यांनी फिर्याद दिली . ही घटना सोमवारी (दि. 3) दुपारी घडली.

फिर्यादीचा मामे भाऊ शिवम फाळके हा येथील एका शाळेमध्ये शिकतो. पूर्वी झालेल्या वादातून शिवमला किरण निकम, ओंकार कदम यांनी मारहाण केली होती. सोहम पाटील याने याबाबत विद्यालयातील शिक्षकांना मारहाणीची माहिती दिली. तसेच सोहमचा मित्र रोहन शिरतोडे याने संशयित रोहन कोळीला याला जाब विचारला. त्यावेळी कोळी याने 'तू आमच्या भांडणामध्ये पडू नकोस, नाहीतर तुला ठार मारीन", अशी धमकी दिली.

त्यानंतर सोहम, शिवम, रोहन शिरतोडे, कार्तिक सावंत, वेदांत फाळके हे भांडण मिटवण्यासाठी पार्थ मोहिते याच्या घरी गेले. यावेळी पार्थ याने वैभव कोळी याला बोलावून घेतले. त्यावेळी कोळी याने कुर्‍हाडीने सोहमच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु सोहमने तो चुकविल्याने त्याच्या हातावर लागला. त्यामध्ये सोहम गंभीर जखमी झाला. तसेच वेदांत फाळके यालाही लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. अन्य संशयितांनी दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. सर्व संशयित फरार झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.