जतमध्ये पाणी आडवणूक करणाऱ्या वन अधिकाऱ्याच्या पाया पडू नका त्यांना हंटरने फोडून काढा ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
जतमध्ये पाणी आडवणूक करणाऱ्या वन अधिकाऱ्याच्या पाया पडू नका त्यांना हंटरने फोडून काढा ;राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
एकीकडे निसर्गाने व दुसरीकडे सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा, कायम दुष्काळी भाग असणाऱ्या जत, कवठेमंकाळ तालुक्याला म्हैशाळ योजनेमधून पाणी देण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली परंतु हे पाणी जत, कवठेमहांकाळ मधील दुष्काळी भागात कालव्याच्या मार्गातून वन विभागाच्या हद्दीतून लोकसहभागातून व सांगलीच्या खासदारांच्या फंडातून चर काढून शेतीसाठी पाणी घेऊन जात असताना जत, मधील वनअधिकाऱ्याने अटलतट्टू भूमिका घेतल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी वन अधिकाऱ्याच्या समोर डोळ्यात पाणी आणून व त्यांच्या पाया पडून विनंती करत आहेत कि वन विभागाच्या हद्दीतून जत तालुक्यातील शेतीसाठी म्हैशाळ च्या योजनेतून आम्हाला शेतीसाठी पाणी द्या, तरी त्या सरकारी वन विभागातील अधिकाऱ्यांना दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे दुःख समजत नसेल तर त्या वनाधिकाऱ्यांना चाबकाने, हंटरने फोडून काढा पुढचं आम्ही निस्तारू अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेले पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.