कर्मवीर पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीरसेवकांच्या पगारातून १० टक्के रक्कम आई वडिलांना देण्याचाही संकल्प चेअरमन श्री. रावसाहेब पाटील
सांगली :- आर्थिक वर्ष २०२२ २०२३ सालाकरिता कर्मवीर पतसंस्थेने १५ टक्के लाभांश जाहीर केला व त्याची रक्कम रु. ३ कोटी ९३ लाख लगेचच सभासदांच्या सेव्हींग खात्यास वर्ग करण्यात आली. संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.
स्वागत व प्रास्ताविक चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्थेच्या भविष्यकालीन योजनांची माहिती सभासदांना दिली. सभेची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलनाने झाली.
चेअरमन यांनी महत्वपुर्ण एक संकल्प करताना सेवकांच्या पगारातून १० टक्के रक्कम आई वडीलांच्या सेव्हींग खात्याला देण्याचा संकल्प सभेमध्ये ठेवला. याचे सर्व सेवक व सभासदांनी जोरदार टाळयांच्या गजरात स्वागत केले. आई वडील ही माणसांची दैवते असून त्यांची सेवा करणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे या पवित्र कार्याचे पालन आम्ही कृतीने पुर्ण करत असल्याचे चेअरमन यांनी नमुद केले.नजिकच्या काळात संस्थेची सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे सभासदांचे जीवन आनंदी बनविणे सभासदांच्या पैशाची आणि वेळेची बचत करणे सभासदाना आधुनिक सेवा देणे, सेवक वर्गामध्ये सेवाभावी वृत्तीची वाढ करणे याला संस्थेचे प्राधान्य राहील याची ग्वाही त्यांनी सभासदांना दिली. संस्थेच्या प्रगतीचे श्रेय त्यांनी संचालक सभासद सेवक यांच्या एकत्रित प्रयत्नाना दिले.सभेपुढील विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी केले. सर्व विषयांना सभासदानी एकमताने मंजुरी दिली. संस्थेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा उपस्थित सभासदांच्यावतीने सत्कार करण्यात आला. संचालिका सौ. चंदन नरेंद्र केटकाळे यांना ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सीए. बी.डी. वांगीकर, प्रा. एम. एस. रजपूत श्री अशोक फावडे, श्री. सुहास मगदुम, श्री. राजकुमार शेरीकर शिवाजीराव पाटील, श्री. विनोद पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करुन संस्थेचे कौतुक केले.
व्हा. चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. सभेस संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. ओ. के. चौगुले (नाना), डॉ. एस. बी पाटील (मोटके ). डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे श्री. आप्पासो गवळी श्री. बजरंग माळी श्री. अमोल रोकडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे श्री. लालासो थोटे यांचेसह मोठया संख्येने सभासद उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव नवले यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.