गणेशोत्सव करीता 1 रूपये मंडप भाडे आकारावे पृथ्वीराज पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
गणेशोत्सव हा अगदी तोंडावर असुन गणेशोत्सवात महापालिका हद्दीतील गणपती मंडळांकडून मंडप व इतर परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात मागण्या होत आहेत. ही परवानगी देताना महापालिकेकडून मडप भाडे प्रतिदिन प्रति स्क्वे. फुट रू. 10 प्रमाणे आकरण्यात येत आहे.
सदरची रक्कम गेल्या वर्षी रू. 1 अशी होती यामध्ये 10 पट वाढ केलेली आहे ही वाढ फार जास्त असल्यामुळे मंडळांना भरणे अशक्य आहे त्यामुळे कदाचीत सर्व गणेश उत्सव मंडळ परवानगी घेतीलच असे नाही. गुंतागुंत टाळण्यासाठी सदरची गणेश उत्सव मंडळांच्यावरील अन्यायकारक दरवाढ रद्द करावी व गेल्या वर्षाप्रमाणे प्रतिदिन प्रति स्क्वे. फुट रू. 1 प्रमाणेच दराची आकारणी करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.