Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार; CCTV दाखवत करीत होता बॅकमेल; पोलिसांनी केले गजाआड

धक्कादायक ! मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार; CCTV दाखवत करीत होता बॅकमेल; पोलिसांनी केले गजाआड 


एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने 45 महिलांवर बलात्कार  करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना पाकिस्तानातील  कराची येथील आहे. आरोपी मुख्याध्यापकाचे नाव इरफान गफूर मेमन असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा आढळून आले आहेत.

पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी हा महिलांवर बलात्कार करत असे आणि या घटनेचे व्हिडिओ त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करुन त्याद्वारे या महिलांना ब्लॅकमेल करत असेल. हे सर्व फूटेज त्याच्या मोबाईल फोनमध्ये आढळून आले आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना पोलिसांनी सांगितले की, बलात्कार केल्यावर त्याच्या सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने आरोपी महिलांना ब्लॅकमेल करत असे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे.

पाकिस्तानमधील मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना इंटरनेटवर काही महिलांच्या आक्षेपार्ह फोटोज संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला. त्यानंतर तपास करताना पोलिसांच्या लक्षात आले की, पीडित महिला या वेगवेगळ्या वेळेत कराचीमधील या शाळेत कामासाठी येत होत्या. या शाळेत महिला शिक्षिकांचे प्रमाण हे अधिक आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सममोर आले. त्यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप तपासण्यात आले. त्याच्या मोबाईलमध्ये 25 व्हिडिओ आढळून आले. यानंतर आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.


चौकशीत आरोपीने खुलासा केला की, इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ महिला शिक्षिकेने बनवला होता जी यामध्ये सहभागी आहे. या महिला शिक्षिकेला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून त्याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.