प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची अवस्था बिकट; मंदिरा बाहेर भीक मागून करते गुजराण
मुंबई, 09 : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे जो पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावतील. व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागताना दिसत आहे, तिचे नाव पूर्णिमा देवी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही 90 वर्षांची वृद्ध महिला सामान्य महिला नसून एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची आई आहे. एवढंच नाही तर तिचा जावई देखील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. मुलीची मुलगी म्हणजेच नात देखील एक अभिनेत्री आहे. असे असताना मात्र पौर्णिमा देवीवर भीक मागून खाण्याची वेळ आली आहे. काय आहे पौर्णिमा देवीची संपूर्ण कहाणी जाणून घ्या. पूर्णिमा देवी यांचा हा व्हिडीओ बिहार तक' या यु ट्यूब चॅनलने शेअर केला असून 'स्कुप वुप' ने याविषयीचे वृत्त दिले आहे.बिहारची राजधानी पटना येथील कालीघाट येथे असलेल्या काली मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागून पूर्णिमा देवी नावाची ही महिला आपला उदरनिर्वाह करत आहे. वृद्धापकाळामुळे तिला चालता येत नाही. त्यामुळे दिवसभर मंदिराच्या पायऱ्यांवर बसूनच त्या भीक मागतात.
पौर्णिमा देवी गेली अनेक दशके काली मंदिरात हार्मोनियमवर भजन गात होत्या. तिचा एक वेगळा दर्जा असायचा, आजही मंदिराच्या आवारात सगळे तिला मॅडम म्हणतात, पण आज तिची दयनीय अवस्था आहे.हा होता बॉलिवूडचा 1 कोटी कमावणारा पहिलाच चित्रपट; 80 वर्षांपूर्वी रचला होता बॉक्स ऑफिसवर इतिहासपूर्णिमा देवी यांनी 1974 मध्ये बाराबंकीचे प्रसिद्ध वैद्य डॉ. एच.पी. यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर पूर्णिमा आणि दिवाकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. 1984 मध्ये मालमत्तेच्या वादातून डॉ. दिवाकर यांची गोळ्या घालून हत्या झाली. पतीच्या निधनानंतर पौर्णिमा सासर आणि मालमत्तेतील वाटा सोडून पाटण्याला आली आणि मावशीकडे राहू लागली.
इथेच तिने गाणे आणि संगीत शिकले आणि रेडिओवरही गायला सुरुवात केली. या दरम्यान पौर्णिमाने स्वतःच्या कमाईने मुलांचा सांभाळ केला आणि हळूहळू पाटणा येथील शाळेत संगीताचे वर्ग घ्यायला सुरुवात केली.पूर्णिमा देवींचा मुलगाही ऑर्केस्ट्रामध्ये मोहम्मद रफीची गाणी म्हणत असे. मात्र काही काळानंतर तो डिप्रेशनचा बळी ठरला आणि आता तो मानसिकदृष्ट्या विकलांग झाला. तर मुलगी वंदना पाटण्यात शिकून मुंबईला गेली आणि टीव्ही मालिकांमध्ये हिरोईन बनली.पौर्णिमा देवीची मुलगी वंदना हिरोईन बनल्यानंतर कधीच परतली नाही किंवा तिने कधी आई आणि भावाची विचारपूस केली नाही.
पूर्णिमा देवी यांना ओळखणारे लोक सांगतात की त्यांच्या मुलीने 'सपने सुहाने लडकपन के'सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. काही लोकांनी तिला तिच्या आईच्या दयनीय अवस्थेची मीडियाद्वारे जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने अशा कोणत्याही महिलेला ओळखण्यास नकार दिला. मुलगी आता आपली ओळख लपवून मुंबईत राहते आहे. बिहारची असूनही ती स्वतःला गुजराती म्हणवते.पाटणा येथील काली मंदिराजवळ दुकान लावणाऱ्या राज किशोर यांच्या म्हणण्यानुसार, एक काळ असा होता की पूर्णिमा मॅडम यांची गणना बिहारमधील सर्वात मोठ्या लोकगायिकांमध्ये केली जात होती.
मोठमोठ्या सरकारी कार्यक्रमात ती गायची. गेली 13 वर्षे ती मंदिराच्या आवारात राहून भजने म्हणायची. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. तिला चालायलाही त्रास होतो. त्यामुळे त्या पायऱ्यांवर पडून राहतात. पूर्णिमा या वयात भीक मागून आपल्या विकलांग मुलाची देखील काळजी घेतात. त्यांची ही अवस्था कोणाच्याही डोळ्यात पाणी आणेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)