Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आरक्षणाच्या आडवे पडणाऱ्या दडपशाही सरकारचा डाव हाणून पाडूयासांगलीत मंगळवारी सकल मराठा समाजाची व्यापक बैठकपृथ्वीराज पाटील यांची माहिती

मराठा आरक्षणाच्या आडवे पडणाऱ्या दडपशाही सरकारचा डाव हाणून पाडूयासांगलीत मंगळवारी सकल मराठासमाजाची व्यापक बैठकपृथ्वीराज पाटील यांची माहिती


सांगली, दि. ३ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील लोकांच्यावर पोलिसांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे, सरकारमधील नेत्याच्या सांगण्यावरूनच हा भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्याच्या विरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आपण सारे एक होऊया असे आवाहन सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाले, या हल्ल्याचा मराठा समाजानेच नव्हे तर इतर समाजानेसुद्धा तीव्र निषेध नोंदवला आहे. आरक्षण मिळू नये यासाठीच आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा हा डाव आहे, त्यासाठी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर केला जात आहे. शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन चिरडले जात आहे. हा त्यांचा डाव आपण हाणून पाडला पाहिजे, त्यासाठीच मंगळवार, दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व्यापक बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, राजमाता जिजाऊ मार्ग, सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे, सांगली येथे होणार आहे.

निष्पाप लोक आणि महिलांच्यावर झालेला हा हल्ला एक मराठा म्हणून कुणीच सहन करणार नाही, त्यासाठी मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावी लागेल. या बैठकीला मराठा समाजातील तसेच इतर समाजातील लोकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.