" नाही बरा हा छंद राधिके..." आदित्य ठाकरेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई : सगळीकडे गणेशोत्सवामुळे भक्तीमय वातावरण झालेलं आहे. अशातच आता उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आदित्य ठाकरे 'नाही बरा हा छंद राधिके...' या गवळणीच्या तालावर तल्लीन होताना दिसत आहेत. या व्हिडिओत आदित्य ठाकरे हातात टाळ घेऊन भक्तिरसात मग्न झालेले दिसत आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि काही अधिकारी देखील परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या परदेश दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.