Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काकडी खायची नाही!... चीन सरकारचा अजबच फतवा

काकडी खायची नाही!... चीन सरकारचा अजबच फतवा 


संपूर्ण जग चीनकडे कायम संशयाच्या नजरेने बघत असते. कधी कुठला आजार जगात पसरवेल आणि कधी कुठल्या धोरणांमधून जगाला धक्का देईल, याचा नेम नसतो. चीन सरकार कायम एक गुप्तता पाळत आले आहे.
त्यामुळे बरेचदा जगाला त्यांचा अंदाजच येत नाही. आता चीन सरकारने त्यांच्या देशातील नागरिकांना काकडी न खाण्याचे आदेश दिले आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात देश आर्थिक प्रगती करेल आणि नवी शिखरे सर करेल, असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. उलट चीनमधील अनेक शहरांवर मंदीचे सावट असून बऱ्याच शहरांमध्ये रोखीचे संकट देखील निर्माण झाले आहे. चीनमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की स्थानिक नागरिकांना समुद्री काकडी खायची नाही, असे तर स्पष्ट बजावण्यात आले आहेच. शिवाय विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे.

विशेषतः काकडी देणाऱ्या रेस्टॉरेंटवर तर कठोर कारवाई होत आहे. समुद्री काकडीच्या आयातीवर बंदी घातल्याने किंमतीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे शेजारी असलेल्या जपानमधील सीफूड व्यावसायिकांना याचा जोरदार फटका बसला आहे. जनतेवरच जबर दंडात्मक कारवाई सुरू असल्यामुळे एकप्रकारचा रोष सरकारच्या विरोधात उसळला आहे. या मार्गाने चीन सरकार निधी कसा उभारणार आहे, असा प्रश्नही लोकांना पडला आहे. एवढेच नाही तर रस्त्यांवरील ओव्हरलोड ट्रकवरही मोठा दंड आकारला जात आहे.



प्राण्यांचेही हाल

चीनचा उत्तर प्रांत असलेल्या लियाओनिंगमधील डोंगशान पार्कमध्ये रोखीच्या संकटामुळे जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी खर्चातून हे प्राणीसंग्राहलय चालतं, पण आता सरकारनेच पैसे देणे बंद केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांचेही पगार झालेले नाहीत. त्यामुळे एकीकडे लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना चीन सरकार प्राणी संग्रहालयाच्या मदतीसाठी पैसे देण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.