Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बनावट प्रमाणपत्र दाखल करून पोष्टात नोकरी; गुन्हा दाखल

बनावट प्रमाणपत्र दाखल करून पोष्टात नोकरी; गुन्हा दाखल 


सागंली : शालांत परीक्षेचे बनावट प्रमाणपत्र दाखल करून पोस्ट खात्यात नोकरी मिळविलेल्या तरूणाविरूध्द विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी मिळाली.

प्रमोद कृष्णात आमणे (वय २९ रा दामानीनगर, सोलापूर) यांने मे २०२२ मध्ये डाकपाल पदासाठी पोस्ट खात्यामध्ये नोकरीसाठी कागदपत्रे ऑनलाईन दाखल केली होती. या कागदपत्रातील माहितीच्या आधारे त्याची नेवरी शाखेत गुणांच्या आधारे निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र दिल्यानंतर तो १ सप्टेंबर २०२२ पासून कामावर हजर झाला.

आणखी वाचा-एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून महागाई भत्त्यात वाढ, आता 'एवढा' मिळणार भत्ता! दरम्यानच्या काळात त्याच्या गुण प्रमाणपत्राची पडताळणी परीक्षा मंडळाकडे करण्यात आली. यावेळी त्याने दाखल केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती समोर आली. यामुळे त्याच्याविरूध्द विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.