Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मदरशातील अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत मौलाना गायब !

मदरशातील अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत मौलाना गायब ! 

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एका मदरशाच्या मौलानावर त्याच्याच अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत फरार झाल्याचा आरोप आहे. अल्पवयीन विद्यार्थीनी १५ वर्षाची आहे. दरम्यान मौलाना जुनैद आलमने तिच्याशी निकाह केल्याचे बोलले जात आहे.

पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मौलाना जुनैद हा विवाहित असून दोन मुलांचा पिता आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. तिने आपल्या पतीला परत आणण्याची विनंती केली आहे. तसेच अल्पवयीन विद्यार्थीनीच्या आईने दि. १७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीच्या अपहरणाची एफआयआर दाखल केली आहे. 

हे प्रकरण प्रतापगडमधील असपूर देवसरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. याप्रकरणी पहिली तक्रार विद्यार्थीनीच्या आईने दि. १७ सप्टेंबर रोजी दाखल केली होती. तिने सांगितले होते की, दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता जेवण करून ती सर्व मुलींसोबत झोपायला गेली होती. रात्री १ वाजता त्यांना जाग आली तेव्हा १५ वर्षीय मोठी मुलगी अंथरुणावर नव्हती. त्यांनी आजूबाजूला खूप शोध घेतला, पण मुलगी सापडली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला होता.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , दि. २१ सप्टेंबर रोजी असपूर देवसरा पोलिस स्टेशन हद्दीतील वाजिदपूरच्या मदरशात शिकवणाऱ्या या मौलानाची पत्नी आपल्या मुलांसह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. महिलेने आपले नाव नुरुल निशा सांगितले. तिने तक्रार दिली की,तिच्या पतीने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केलयं.  नुरुल निशाच्या म्हणण्यानुसार तिला जुनैदपासून चार मुले होती. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. आता निशाकडे तिच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी पैसे नाहीत. जुनैद अनेक दिवसांपासून पत्नी आणि मुलाला भेटायला आलेला नाही. जुनैदने तिच्याच विद्यार्थिनीशी लग्न केल्यानंतर ती असहाय्य झाली आहे.

प्रतापगढचे अतिरिक्त एसपी विद्यासागर मिश्रा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पोलिसांचे पथक फरार मौलानाच्या शोधात बिहार आणि इतर काही भागात छापे टाकत आहेत. जुनैदला लवकरच अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. मौलाना जुनैद हा मूळचा झारखंडमधील गढवा येथील आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.