Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या. पोलिस तपासात समोर आले हे कारण.

१४ वर्षांच्या विद्यार्थ्याने केली शिक्षकाची हत्या. पोलिस तपासात समोर आले हे कारण.

नवी दिल्ली:  शिक्षक दिनाच्या पूर्वीच नवी दिल्ली मध्ये एक भयानक अशी घटना घडली आहे . शाळेतील विद्यार्थ्यांची वारंवार गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाच्या या विकृत मनोवृत्तीला आणि त्रासाला तसेच अत्याचाराला कंटाळून शिक्षकाकडून होत केवळ १४ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांने पेपर कटर च्या साह्याने शिक्षकाचा खून केला या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

म्हणून विद्यार्थ्याने घेतला बदला

खरे म्हणजे शिक्षकाचे काम हे विद्यार्थ्यांना ज्ञान करणे असते, परंतु आजच्या समाजात काही वाईट प्रवृत्तीचे शिक्षक देखील आहेत. ते विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी भलतेच काहीतरी वेगळेच काम करतात आणि त्यातून मुलांना शारीरिक मानसिक आघात सहन करावे लागतात. एक वाईट व विकृत वृतीचा शिक्षक हा वारंवार मुलाशी गैरवर्तन करत होता. आणखी वाईट म्हणजे त्याने मुलासोबत केलेल्या गैरकृत्याचा व्हिडीयो देखील तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन शिक्षक मुलावर वारंवार अत्याचार करत होता. याचा सर्वच विद्यार्थ्यांना मोठा राग येत होता मात्र कोणीही काही करू शकत नव्हते, अखेर एका विद्यार्थ्यांने या घटनेचा बदला घेण्याचे ठरविले आणि मग तशी तयारी त्याने केली.



धारदार शास्त्राचा वापर

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेलली माहिती अशी की, जामिया नगर येथील बाटला हाऊसमधील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील काहीतरी विपरीत घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यासंदर्भात खबर लागताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे जाऊन बघितले तर एका खोलीबाहेर रक्त बाहेर येत होते, खोलीचा दरवाजा उघडला असता मृत शिक्षकाच्या मानेवर खोलवर जखमा असल्याचे निदर्शनास आले. आपल्या कुटुंबासह राहणारा हा शिक्षक समलैंगिक होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने त्या मुलाची भेट घेतली होता. त्यानंतर तो सातत्याने त्याचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो मुलाला देत होता, एके दिवशी शिक्षकाने मुलाला जामिया नगरच्या घरी भेटायला बोलवले होते. त्यावेळी मुलगा पूर्ण तयारीनिशी तेथे दाखल झाला. त्याने घरी पोहोचताच पेपर कटरने शिक्षकांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला. आता या मुलाविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.