Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायको रोज बीअरच्या बाटलीची मागणी करते याला नवरा वैतागला, सासूबाई म्हणाल्या ' ती फक्त दारू पिते, रक्त नाही'

बायको रोज बीअरच्या बाटलीची मागणी करते याला नवरा वैतागला, सासूबाई म्हणाल्या ' ती फक्त दारू पिते, रक्त नाही'


आपण असे अनेक प्रकरणं पाहिले आहेत, जिथे पतीच्या दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झालेली आहे. हल्लीच्या जगात तरुण असो किंवा तरुणी सर्रास दारु घेतात आणि सिगरेट ओढतात. उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते, असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारमध्ये त्याने सांगितलं की, पूर्वी त्याची पत्नी रोज रात्री बिअर मागवायची, हळूहळू तिची ही सवय एवढी वाढली की, बिअरशिवाय तिचं होतं नाही आणि यासाठी ती त्याचे सगळे पैसे उडवून टाकते. त्या व्यक्तीची तक्रार ऐकून पोलिसांनाही पेचात अकडले आहेत. 

पुढे तो व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा त्याच्या पत्नीला दारू मिळत नाही ती सर्व घर डोक्यावर घेते आणि गोंधळ घालते. एवढंच नाही तर ती पतीला मारहाणही करते, असंही त्याने पोलिसांना सांगितलं आहे. जेव्हा त्याने पत्नीच्या घरच्यांकडे तिची तक्रार केली तेव्हा तेही मुलीच्या या कृत्याने पुरते हादरुन गेले आहेत. पण त्यांचे उत्तर ऐकून त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. त्या व्यक्तीचे सासू सासरे म्हणाले की, तिला दारू पाजता येतं नाही मग लग्न तरी का केलं? एवढंच नाही तर सासू म्हणाली की, ती फक्त दारू पिते तुझं रक्त तर पीत नाही ना...


या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आणि पत्नीच्या बिअरच्या व्यसनाला कंटाळून त्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली आणि मदतीची मागणी केली. या व्यक्ती पोलिसांना बायकोपासून सुरक्षेसाठी घराबाहेर पोलीस तैनात करण्याची मागणी केली आहे. जर ते सुरक्षा देऊ शकत नाही तर पत्नीला दारूच्या व्यसनातून मुक्त करावे, असं तो पोलिसांकडे म्हणाला. कारण त्याच्या पत्नीने त्यावर अनेक वेळा कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला आहे, अशी धक्कादायक आरोप त्याने पोलिसांकडे केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.