Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'वापरा आणि फेका' हेच भाजपचे धोरण, भाजपच्या नेत्या उमा भारती यांची सडकून टीका

'वापरा आणि फेका' हेच भाजपचे धोरण, भाजपच्या नेत्या उमा भारती यांची सडकून टीका


आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचार सुरू केला आहे. पक्षाने जन आशीर्वाद यात्रा सुरू केली, परंतु भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना पक्षाने डावलले आहे. जन आशीर्वाद यात्रेचे निमंत्रण न मिळाल्याने उमा भारती यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये आता 'वापरा आणि फेकून द्या' असे धोरण आले आहे, अशा शब्दांत उमा भारती यांनी स्वपक्षावर हल्ला चढवला आहे. आता भाजपने निमंत्रण पाठवले तरी मी तिकडे फिरकणार नाही, असेही त्या या वेळी म्हणाल्या.



पक्ष माझ्यासाठी सर्वकाही आहे, असे सांगतानाच उमा भारती पुढे म्हणाल्या, पक्षात जे वाईट आहे ते दूर करेन. जन आशीर्वाद यात्रेत मला बोलवायला हवे होते. का बोलावले नाही, यासंबंधी मी जाब विचारेन. भाजपने माझ्यासोबतचे राजकीय संबंध तोडले आहेत. पोस्टरवर नावसुद्धा टाकले नाही, हे चांगले केले नाही, असेही आता निमंत्रण मिळाले तरी आपण भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत जाणार नाही.

ज्येष्ठांचा अपमान करतात त्यांना देवसुद्धा माफ करीत नाही

भाजपमधील जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही भाजपची जुनी सवय आहे. पेंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील शिवराज सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला फेकले आहे. जे लोक ज्येष्ठांचा अपमान करतात त्यांना देवसुद्धा माफ करीत नाही, हा भारताचा इतिहास आहे, असे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.