G 20 ..! अबब जो बायडेनना भारतात आणण्यासाठी 12,43,98,97,50,000 ही किंमत आहे का मोदी ? प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली : जगातील प्रमुख नेते जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत. काल अमिरिकेचे राष्टाध्यक्ष ज्यो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर भारत आणि अमेरिकेचे संंबंध आणखी मजबूत होतील, मला याचा आनंद आहे. असं ट्विट बायडन यांनी केले आहे. यावरून आता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ₹१२,४३,९८,९७,५०,०००! इतकी रक्कम ट्विट केली आहे. त्याखाली त्यांनी बायडनला भारतात आणण्याची ही किंमत आहे का मोदी असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचसोबत मला सांगण्यात आले आहे की मोदी यांनी युएस आधारीत कंपन्यांना ₹१२,४३,९८,९७,५०,००० किमंतीचे संरक्षण करार देत आहात, ज्यामुळे रशियाचे पंतप्रधान पुतिन यांनी जी २०शिखर परिषदेची भेट रद्द केली असावी. असंही त्यांनी सांगितलंय.
त्याचसोबत अमेरिकामध्ये अधिक रॅली आणि टाऊन हॉलमध्ये प्रवेश देण्यासाठी आणि डायस्पोराकडून अधिक निवडणुक निधी मिळवण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाला संतुष्ट करण्याची तुमची गरज रशियावर अमेरिकेची बाजू घेण्याचे तुमचे धोरण आहे का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.